विक्रोळीत फेरीवाल्याकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या विक्रोळी परिसरात कपडे विक्रीच्या बहाण्याने घरात घुसून एका फेरीवाल्याने १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. महिनाभराने तो पुन्हा दिसताच स्थानिक नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या विक्रोळी परिसरात कपडे विक्रीच्या बहाण्याने घरात घुसून एका फेरीवाल्याने १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर महिनाभराने आरोपी पुन्हा परिसरात दिसताच स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मोहम्मद अन्नास असे अटक आरोपीचे नाव असून विक्रोळी पोलिस पुढील तपास करत आहेत.
ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात परिसरात कपडे विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला तिच्या घराजवळ गाठले. कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला जवळ बोलावून तिला अश्लील स्पर्श केला. त्यानंतरही आरोपी मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. अखेर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.
२४ नोव्हेंबर रोजी मुलीच्या आईने संबंधित संशयित व्यक्तीला परिसरात पाहिले आणि त्याची ओळख पटवली. त्याला जाब विचारला असता त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अन्य कुठला गुन्हा केला आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
X.Badami--BD