मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर पलटी; दोन्ही दिशांना वाहतूक ठप्प
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंढवले गावाजवळ भरधाव कंटेनर ट्रेलर उलटल्याची घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, ट्रेलर चालक जखमी होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंढवले गावाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव कंटेनर ट्रेलर उलटल्याने दोन्ही दिशांना वाहतूक ठप्प झाली आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झाले असून, वाहतूक कोंडी काढण्यासाठी आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलरवरील कंटेनर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पडले. या अपघातात महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या दुर्घटनेत ट्रेलर चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
C.F.Salvi--BD