कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील १२ कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नाला निवळी
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील तंत्र मदतनीस कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या चुकीच्या नियुक्तीच्या प्रश्नावर सरकारने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०१० पासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर या संघटनेची मागणी मान्य करून संबंधित १२ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत बदल करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील तंत्र मदतनीस पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या चुकीच्या नियुक्तीच्या प्रश्नावर सरकारने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०१० पासून सुरू असलेल्या दीर्घकाळापासूनच्या पाठपुराव्यानंतर अखेर या संघटनेची मागणी मान्य करून संबंधित १२ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत बदल करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, तंत्र मदतनीस कर्मचाऱ्यांना चुकीची वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी २०१० पासून सरकारकडे पत्रव्यवहार आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर सरकारने मागणी मान्य करून वेतनश्रेणीत बदल करण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध केला आहे.
या यशाचे श्रेय संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याला दिले जात आहे. या कामी संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक पेणकर, सरचिटणीस शरद जाधव, खजिनदार गुलाब पाटील, श्रीपाद लोखंडे, प्रशांत जावळे, दीपक तुंगारे, गंगाधर राठोड आणि ज्ञानेश्वर गोडसे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
या अध्यादेशाचा लाभ एकूण १२ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनसाचे वातावरण आहे. परिवहन उपक्रमातील या गटाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर झाल्यामुळे त्यांच्या भविष्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
F.Varghese--BD