पालघर: निर्मळ येथील कार्तिक स्वामी दर्शन सोहळा आणि यात्रा आयोजन
पालघर जिल्ह्यातील निर्मळ येथील कार्तिक स्वामी मंदिरात आज दर्शन सोहळा पार पडत आहे. पहाटे दोन वाजता पूजेला सुरुवात झाली असून, 4 ते 15 डिसेंबरदरम्यान प्रसिद्ध निर्मळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहासात नोंदवलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार चिमाजी आप्पांनी केला होता.
पालघर : पालघर जिल्ह्यातील निर्मळ येथील श्रीक्षेत्र कार्तिक स्वामी मंदिरात आज दर्शन सोहळा पार पडत आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटे दोन वाजता या ठिकाणी पूजेला सुरुवात करण्यात आली असून, मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्राच्या योगाने कार्तिक स्वामी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. या विशेष दिवशी कृतिका नक्षत्र संपेपर्यंत महिलांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतिहासातील नोंदींनुसार, वसईचा किल्ला जिंकल्यानंतर नरवीर चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
कार्तिक स्वामींचा दर्शन सोहळा संपल्यानंतर 4 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत निर्मळ येथे प्रसिद्ध श्रीमद जगतगुरु शंकराचार्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी ही एक असून, 15 डिसेंबरपर्यंत भाविकांना धार्मिक सोहळा आणि यात्रेचा आनंद घेता येणार आहे.
E.Narula--BD