बंगळुरूत प्रियकरानं हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून धक्का देऊन तरुणीचा खून
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक भयानक प्रकरण समोर आले आहे. इंटरव्ह्यूसाठी जात असल्याचं सांगून घरातून निघालेली ऐश्वर्या नावाच्या तरुणीचा तिच्या प्रियकर संतोषने हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून खिडकीतून धक्का देऊन खून केला. सुरुवातीला ही आत्महत्येची घटना असल्याचं मानलं गेलं होतं, पण पोलिसांच्या तपासातून हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका तरुणीच्या खूनप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. इंटरव्ह्यूसाठी जात असल्याचं सांगून घरातून निघालेली ऐश्वर्या नावाच्या २६ वर्षीय तरुणीचा तिच्या प्रियकरानं हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून खिडकीतून धक्का देऊन खून केला. सुरुवातीला ही आत्महत्येची घटना असल्याचं मानलं गेलं होतं, पण पोलिसांच्या कठोर तपासातून हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हसन जिल्ह्यात राहणाऱ्या ऐश्वर्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा संतोष नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध होते आणि दोघे लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र, लग्नाबाबत संतोष टाळाटाळ करत होता. याच वादातून संतोषकडे ऐश्वर्याचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ असल्याचा गैरफायदा घेत त्यानं तिला धमकी दिली होती. त्याच फोटोंच्या आधारे संतोषनं ऐश्वर्याला भेटण्यासाठी बोलावले होते.
१९ नोव्हेंबर रोजी कामासाठी इंटरव्ह्यूला जात असल्याचं कुटुंबाला सांगून ऐश्वर्या घरातून निघाली. पण ती संतोषला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये पोहोचली. दोघे त्या हॉटेलच्या लॉजमध्ये थांबले आणि संध्याकाळपर्यंत मद्यपान केलं. याच वेळी दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
वादातून ऐश्वर्यानं 'ना माझा तुझ्यावर विश्वास आहे, ना माझ्या कुटुंबाचा,' असं म्हटलं होतं. यावर तिने जीव देण्याची धमकीदेखील दिली. त्यावर संतोषनं 'जे करायचंय ते कर' असं म्हणत तिला खिडकीतून बाहेर ढकललं. संतोषच्या धक्क्यामुळे ऐश्वर्याचा तोल गेला आणि ती हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिथे एका विजेच्या खांबावर आदळल्यानं तिला गंभीर इजा झाली.
घटनास्थळावरून तातडीने ऐश्वर्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. १९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडेसात वाजून पाच मिनिटांनी ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची नोंद सुरुवातीला आत्महत्येच्या स्वरूपात केली होती. पण तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे आणि माहितीच्या आधारे हे प्रकरण हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं. ऐश्वर्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोषला अटक केली आहे. पोलिसांकडून संतोषची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झालेला नसून तिच्या प्रियकरानं केलेल्या हल्ल्यामुळे झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे यावरून संतोषने ऐश्वर्याला खिडकीतून ढकलल्याचे स्पष्ट होते. पोलीस हे प्रकरण अधिक तपासत आहेत.
G.Luthra--BD